महाराष्ट्रात सुमारे 10 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची होणार भरती…….!
मुंबई दि.१७ – महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढीमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तातडीने आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाला देण्यात आला आहे. राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाला तब्बल 10 हजार 127 आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. आरोग्य विभागातील पाच संवर्गातील तब्बल 10 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात हा प्रस्ताव आहे.
महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे, त्याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेसह कर्मचार्यांची ही कमतरता भासत आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत 10 हजार 127 आरोग्य कर्मचाऱ्यांची विविध पदे भरण्यास संदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे.
दरम्यान जिल्हा परिषद अंतर्गत 10 हजार 127 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांमध्ये आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता तसेच तंत्रज्ञ अशा पाच संवर्गांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रस्तावाला ग्रामविकास आणि वित्त मंत्री यांनी हिरवा कंदील दाखवल्यास ही भरती तातडीने सुरू करण्यात येईल.