#Corona
दुकाने कडकडीत बंद तरीही वर्दळ कांही थांबेना, केज शहरातील चित्र……!
केज दि.१८ – संचारबंदी अन त्यात वीकेंडलॉक डाउन मुळे शहरातील केवळ मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व दुकाने कडकडीत बंद आहेत.तरीही रस्त्याने ये जा करणाऱ्या लोकांची मोठी वर्दळ दिसून येत आहे. त्यामुळे लोक केंव्हा सुधारतील असा प्रश्न पडला आहे.
राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.तर शनिवार आणि रविवार या दिन दिवशी वीकेंड लॉकडाउन आहे. मागच्या लॉक डाउन मध्ये अन्य कांही दुकाने उघडी होती. मात्र या शनिवारी आणि रविवारी केज तालुका प्रशासनाने चांगलेच मनावर घेतल्याने मेडिकल्स आणि दवाखाने वगळता शहरात एकही दुकान उघडे नाही.
मात्र असे जरी असले तरी सकाळ पासून 12 वाजेपर्यंत रस्त्याने फिरणारे मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. तसेच सर्वच वाहनांचीही वर्दळ मोठी आहे. तर दुपारी जरा उन्हाचा कहर सुरू झाला की लोक थोडे घरात बसत जरी असले तरी ऊन उतरल्यावर पुन्हा लोक बाहेर निघत आहेत. तहसील, नगरपंचायत व पोलिस मोठ्या प्रमाणावर बाहेर न पडण्याचे आवाहन करत असले तरी कांही बेशिस्त लोक ऐकत नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आरोग्य कर्मचारी त्रस्त झाले आहेत. शहरातील दोन्हीही कोविड केअर सेन्टरवर रुग्णांची मोठ्या प्रमाणावर भरती होत असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती निर्माण झाली आहे.तरीही लोक गांभीर्याने घेत नसल्याने शेवटी बळाचा वापर करण्याची वेळ येते की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
माजलगाव पॅटर्न राबवण्याची गरज…….!
जिल्ह्यात संचारबंदी सुरू असतानाही माजलगाव शहरातही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मोकाट फिरणारे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. मात्र आता यावर निर्बंध घालण्यासाठी तहसिल व नगर परिषद प्रशासनाने एक अनोखा उपक्रम सुरू केला असून, जे कोणी विनाकारण रस्त्यावर दिसून येतील अश्या लोकांची जाग्यावरच अँटीजन टेस्ट करून लागलीच कोविड सेन्टरमध्ये भरती करण्याचे आदेश तहसीलदार वैशाली पाटील व मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी काढले आहेत.
त्यामुळे केज शहरातही माजलगाव सारखा पॅटर्न सुरू केला तर विनाकारण घराच्या बाहेर पडणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर नक्कीच वचक बसेल. दरम्यान या विषयावर विचारही सुरू असून सदरील पॅटर्न राबवण्यासाठी पुरेशे आरोग्य कर्मचारी असणे गरजेचे आहे.त्यामुळे केज तालुका आरोग्य विभागाला जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध होण्याची गरज आहे.
बीड जिल्ह्यात आज 1145 तर केज 131….!
बीड दि. 18- आज जाहीर करण्यात आलेल्या 4725 कोरोना अहवालात जिल्ह्यात 1145 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 1131 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात अंबाजोगाई 219, आष्टी 149 , बीड 276 , धारूर 38 , गेवराई 88 , केज 131, माजलगाव 91 , परळी 59 , पाटोदा 47 , शिरूर 31 , वडवणी 15 असे रुग्ण आढळून आले आहेत.