#Vaccination

१८ वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी असे करा रजिस्ट्रेशन……..!

बीड दि.२० – १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे. कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता  ही लस घ्यायची कुठे, त्यासाठी कसे रजिस्ट्रेशन करायचे असे अनेकांना प्रश्न पडले आहेत. तर लस घेण्यासाठी लसीकरण केंद्राची अपॉइंटमेंट कशी घ्यायची, लसीचे दोन डोस झाल्यावर सर्टिफीकेट कसे डाऊनलोड करायचे याच्या टिप्स…
अशी करा नोंदणी
१. आपण लसीसाठी पात्र असू तर  www.cowin.gov.in  वेबसाईटवर जावे.  तेथे तुमचा मोबाईल क्रमांक टाका. त्या नंबरवर ओटीपी येईल. हा ओटीपी टाइप केल्यावर व्हेरिफाय बटनावर क्लिक करा.
२. यानंतर रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर व्हॅक्सिनेशन  हा ऑप्शन येईल. येथे  तुम्हाला फोटो आयडी टाइप, फोटो आयडी प्रूफ नंबर, नाव, जन्म दिनांक, जेंडर आणि अन्य माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर क्लिक केल्यावर एक एसएमएस येईल. त्यात तुमचे डिटेल्स असतील. त्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी रेफरन्स आयडी दिला जाईल. तो आपल्याला जपून ठेवला पाहिजे.
३. तुम्ही या अकाउंटला तीन लोकांसोबत लिंक शेयर करू शकता. यासाठी तुम्हाला अकाउंट डिटेल्स पेजच्या खाली दिलेल्या अॅड मोअर बटनवर क्लिक करा. याआधी भरलेली डिटेल्स पुन्हा आपल्याला भरावी लागतील.
४. लस घेण्यासाठी आपल्या जवळचे सेंटर शोधण्यासाठी   www.cowin.gov.in  वर जाऊन खाली जावे. या ठिकाणी मॅप आणि डायलॉग बॉक्स मध्ये आपल्याला एन्टर प्लेस, अॅड्रेस, लोकेशन इत्यादी डिटेल्स एन्टर करावे लागतील त्यानंतर गो बटन टॅप करा.
५. अपॉइंटमेंट फिक्स करण्यासाठी अकाउंट डिटेल पेजवर जावे. यानंतर कॅलेंडर आयकॉन वर क्लिक करून स्केड्यूल अपॉइंटमेंट बटन क्लिक करा. तेथे तुम्हाला व्हॅक्सिनेशन पेजवरून तुम्ही जवळचे आणि आपल्याला हवे ते लसीकरण केंद्र निवडू शकता.
६.तुम्ही सेंटरचा पर्याय निवडल्यानंतर स्लॉट निवडा. यानंतर बुक बटन क्लिक करा. यानंतर अपाइंटमेंट कन्फर्मेशन पेज ओपन होईल. आपली माहिती तपासून क्लिक करा.
७. कोविड १९ लस सर्टिफिकेटला डाउनलोड करण्यासाठी cowin.gov.in, Aarogya Setu अॅपवर जावे लागेल. तेथे कोविन टॅप वर जावे लागेल. यानंतर व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट पर्यायावर गेल्यानंतर बेनिफिशियरी रेफरन्स आयडी टाका. त्यानंतर गेट सर्टिफिकेट बटनावर क्लिक केल्यानंतर सर्टिफिकेट तयार  होईल.यात नाव, जन्म दिनांक, बेनिफिशियरी रेफरेंन्स आयडी, फोटो ओळखपत्र, लसीचे नाव, हॉस्पिटलचे नाव हे सर्व उपलब्ध असेल

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close