क्राइम
बहिणीचा खुनी भाऊ व साथीदारास केज पोलीसांनी ठोकल्या बेड्या……..!
केज दि.२७ – पाडव्याच्या सणानिमित्त पुणे येथून केज तालुक्यातील बोरगाव येथे आईला भेटण्यास आलेल्या बहिणीचा मित्राच्या मदतीने भावानेच डोक्यात हत्याराने वार करून खून केल्याची घटना घडली होती. मात्र खून करून फरार झालेल्या भावासह त्याच्या मित्रास केज पोलिसांनी एका आठवड्याच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.
पाडव्याच्या सणा निमित्त आठवड्यापूर्वी आईला आलेल्या भेटण्यासाठी केज तालुक्यातील बोरगाव येथे पुणे येथून शितल लक्ष्मण चौधरी वय २८ वर्ष ही तिची मुलगी परीला आल्या होत्या. मात्र अज्ञात कारणावरून मयत महिलेचा भाऊ दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर दोन्ही रा. बोरगाव यांनी दिनांक २० एप्रिल रोजी मध्यरात्री दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास बहिणीच्या डोक्यात हत्याराने वार करून तिचा खून केला होता. मात्र खून करून भाऊ दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर हे दोन्ही आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी मयत महिलेचा चुलत भाऊ नानासाहेब जालींदर गव्हाणे यांने दिलेल्या फिर्यादी वरून केज पोलिस ठाण्यात दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर दोन्ही रा. बोरगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दोन्ही आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके स्थापन केली होती. आरोपीचा शोध घेत असताना दोन्ही आरोपी उस्मानाबाद जिल्ह्यातील इट येथे शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्या वरून केज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम काळे, दिलीप गीते, अहंकारे, वैभव राऊत यांनी दिनु गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर याा दोघा आरोपीना शेतातून सोमवार दिनांक २६ एप्रिल रोजी इट येथे बेड्या ठोकून केज पोलीस ठाण्यात हजर केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली आहे.