#Corona

केज तालुक्यात कोरोना रुग्णांचा आलेख ग्रामीण भागातच वाढतोय……!

केज दि.२७ – संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार झाला आहे. दुसऱ्या लाटेत बीड जिल्हाही याला अपवाद राहिलेला नाही. प्रत्येक तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाने घट्ट पाय रोवले असून केज तालुक्यातील बहुतांश गावात रुग्ण वाढीचा वेग वाढला आहे. तर तालुक्यातील कांही गावे तर हॉटस्पॉट झालेली आहेत.  

            केज तालुक्यात दि.२६ एप्रिल २०२१ पर्यंत २९७२३ कोरोना टेस्ट झाल्या असून यामध्ये ग्रामीण भागातील २८६२ ते शहरी भागातील ९७६ असे एकूण ३८३८ रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. तर यामध्ये ७८ रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये ग्रामीण भागातील ७१ तर शहरी भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्याचा पॉजिटिव्हीटी रेट १२.९१ असा आहे तर डेथ रेट २.४८ एवढा आहे. आतापर्यंत पॉजिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी २८९६ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ७५.४६ टक्के आहे.
           सध्या तालुक्यात ८६३ रुग्ण उपचारखाली असून यामध्ये ग्रामीण भागातील ७६१ तर शहरी भागातील १०२ रुग्ण आहेत. यामध्ये पिसेगाव कोविड सेंटर मध्ये १७२ तर शारदा कोविड सेंटर मध्ये १६० रुग्ण उपचार घेत आहेत. तर योगिता कोविड हॉस्पिटलमध्ये ५० तर जिल्ह्यात इतरत्र ३०७ रुग्ण उपचाराखाली आहेत. तालुक्याचा डबलिंग कालावधी २१ दिवसांचा आहे.
           दरम्यान तालुक्यात सरकारी कोविड सेन्टरमध्ये ३५० तर खाजगी दवाखान्यात ५० बेडची व्यवस्था असून पिसेगाव व शारदा कोविड सेन्टरमध्ये ४३ बेड शिल्लक असून गरज पडल्यास आणखी २०० बेड्स वाढवण्याची तयारी असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी दिली. तसेच दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख ग्रामीण भागात वाढत चालला असून गावागावातील नागरिकांनी कोरोना विषयक नियमांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे.तसेच सध्या मिशन झिरो डेथ अभियान सुरू असून घरी तपासणी करण्यासाठी येणाऱ्या आरोग्य सेवकांना सत्य परिस्थिती सांगून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहनही डॉ.आठवले यांनी केले आहे. 

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close