क्राइम
केज शहरात दोन गटात हाणामारी, आठ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल…..!
डी डी बनसोडे
May 23, 2021
केज दि.२३ – मोबाईल चॅटिंगवरून दोन गटात लाकडाच्या ढिलपी आणि काठीने तुंबळ हाणामारी झाल्याची घटना केज शहरातील फुले नगर भागात घडली. या प्रकरणी केज पोलिसात दोन्ही गटाच्या आठ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाला आहे.
लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील बळी जगन्नाथ कळसे यांच्या हिणीसोबत केज शहरातील फुले नगर भागातील अक्षय शंकर पौळ हा मोबाईलवर चॅटिंग करून शिवीगाळ करीत होता. त्यामुळे २२ मे रोजी दुपारी १२.३० वाजता कळसे हे इतर नातेवाईकांसह पौळ याच्या घरी आले होते. त्यांनी तुमच्या मुलाला चांगले सांभाळा, भांडणे करू नका असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षय शंकर पौळ, लता शंकर पौळ, विजय शंकर पौळ यांनी लाकडाच्या ढिलप्या उचलून मारहाण केल्याने बळी कळसे व त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांचे डोके फुटले. तर त्यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या ही दिल्या. अशी फिर्याद बळी कळसे यांनी दिल्यावरून अक्षय पौळ, लता पौळ, विजय पौळ यांच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक आशा चौरे ह्या करीत आहेत.
तर दुसऱ्या गटाचे अक्षय शंकर पौळ याने दिलेल्या फिर्यादीनुसार २२ मे रोजी दुपारी १२.३० वाजता विष्णु प्रकाश कळसे, नागेश कळसे, पपिता प्रकाश कळसे ( सर्व रा. दत्तनगर, मुरुड ता. जि लातुर ), सोन्या वैरागे, सुनिता वैरागे ( दोन्ही रा. सादोळा ता. केज ) हे संगनमत करून पौळ याच्या घरी आले. फोनवर चॅटींग करण्याचे व शिवीगाळ करण्याच्या कारणावरुन अक्षय पौळ यास लाथाबुक्याने मारहाण केली. तर विष्णू व सोन्या या दोघांनी काठीने मारून दुखापत केली तसेच सर्वांनी शिविगाळ करुन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. अशी फिर्याद अक्षय पौळ याने दिल्यावरून विष्णु कळसे, नागेश कळसे, पपिता कळसे, सोन्या वैरागे, सुनिता वैरागे या पाच जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रुक्मिणी पाचपिंडे ह्या करीत आहेत.