तिसऱ्या लाटेमध्येही लहान मुलांना सर्वाधिक धोका असेल असं वाटत नाही…..!
नवी दिल्ली दि.२५ – देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असतानाच भारतात कोरोनाची तिसरी लाटही येणार असल्याचे तज्ज्ञांनी बोलून दाखवले आहे. दरम्यान, तिसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यासंबंधी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. रणदीप गुलेरिया यांनी पहिल्या व दुसऱ्या लाटेत लहान मुलं जास्त प्रभावित झाली नाहीत त्याचबरोबर तिसऱ्या लाटेमध्येही लहान मुलांना सर्वाधिक धोका असेल असं वाटत नाही, असं मत व्यक्त केलं आहे. यामुळे घरात लहान मुले असणाऱ्या पालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात प्रौढांना संसर्ग झाला लहान मुलांवर त्याचा प्रभाव तेवढ्या प्रमाणात होऊ शकला नाही. त्यामुळे तिसर्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होऊ शकतो. अशी शक्यता ज्यांनी मुलांबद्दल हे सांगितलं त्यांनी व्यक्त केली आहे. अद्याप त्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असंही डॉ. रणदीप गुलेरिया यांनी बोलताना म्हटलं आहे.
दरम्यान लहान मुलांना तिसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा धोका अधिक आहे याचे कोणतेही पुरावे अद्याप मिळालेले नाहीत किंवा तसं अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे तिसर्या लाटेत लहान मुलांना धोका असेल असं वाटत नाही. अशाप्रकारे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मत व्यक्त केल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर ब्लॅक फंगस आजारदेखील एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही, हा संसर्गजन्य आजार नाही. असं देखील रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केलं आहे.