क्राइम
कत्तल खान्याकडे घेऊन जात असलेल्या 49 मुक्या प्राण्यांची सुटका, विशेष पथकाची कारवाई…..!
बीड दि. 7 – आयशर टेम्पोसह पीकअपमधून कत्तलखाण्याकडे गाई घेऊन जातांना, तीन वाहनांना बीड पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पकडले आहे. यामध्ये गाईसह वासरे असे तब्बल 49 जनावरे आढळून आले आहेत.
विशेष पथकाचे प्रमुख विलास हजारेंना गाई कत्तलखाण्याकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे त्यांनी मांजरसुंबा चौकात सापळा लावला होता.त्यामध्ये आज पहाटे आष्टी तालुक्यातील खडकत येथून गायी व वासरे बीडमधील कत्तल खाण्यात दोन पिकअप व आयशरमधून घेऊन निघालेल्या तीन
वाहनांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये गायी, वासरे असे एकूण 49 जनावरे आढळून आली आहेत. यावेळी चालकाच्या सीटखाली देखील लहान वासरांना कोंबून ठेवण्यात आले होते. त्या सर्व मुक्या जनावरांची सुटका करून त्यांना चौसाळा येथील महावीर गोशाळेत सोडण्यात आले आहे.
दरम्यान या कारवाईत 19 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात 9 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.