शेती
भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी दत्तक गावातील सरपंचांची घेणार भेट…..!
बीड दि.२२ – जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँकेच्या सर्व पीक कर्ज खातेदारांना अवगत करण्यात येते की, दिनांक 23.6.2021 ते 30.6.2021 दरम्यान भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी / फिल्ड ऑफीसर त्यांचे अधिपत्याखालील दत्तक गावातील सरपंचांना भेट देतील व नुतनीकरणांस योग्य असलेल्या शेतकऱ्यांची यादी देऊन संबंधित गावातील शेतकऱ्यास पिक कर्ज नूतनीकरण करणेस प्रोत्साहीत करतील.
त्यासाठी शेतकरी हे फक्त एक पानी अर्ज बँकेत दाखल करून 10% ते 20% पर्यंत वाढीव पीक कर्जाचा लाभ घेऊ शकतील. सदर पिक कर्जाचे नुतनीकरण शेतकऱ्यांना स्टेट बँकेच्या योनो (SBI YONO) या ऍपवरुन देखील शेतकऱ्यांना करता येणार आहे. तसेच 3 लाख कर्ज मर्यादे पर्यंतच्या कर्जात डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना व केंद्र सरकारमार्फत प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार व्याजात भरघोस सवलतीचा लाभही शेतकऱ्यांनी देण्यात येईल.
तरी विहीत अटी व शर्तीचे पालन करुन या योजनेचा 30 जून 2021 पर्यंत सर्व शेतकरी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी बीड, नंदकिशोर भोसले, स्टेट बँक ऑफ इंडिया सहाय्यक महाप्रबंधक, अमोल गायके, नोडल जिल्हा कृषी अधिकारी एसबीआय बीड आणि जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्रीधर कदम यांनी केले आहे.