केज दि.२४ – ओबीसी समाजाच्या अतिरिक्त आरक्षणावर गंडांतर आणणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ओबीसी समाज एकवटला आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले असून जोपर्यंत आरक्षण पुन्हा लागू होत नाही तोपर्यंत ओबीसी समाज आंदोलन करत राहणार आहे.आणि याचाच एक भाग म्हणून दि.२६ जून रोजी संपूर्ण राज्यात चक्काजाम आंदोलनाची हाक भाजपच्या वतीने ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली असून त्यानुसार केज शहरात होणाऱ्या आंदोलनासाठी ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपचे युवानेते विष्णू घुले यांनी केले आहे.
ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवण्यात महाविकास आघाडी कारणीभूत आहे. सदरील आरक्षण संपुष्टात आल्याने प्रवाहात आलेला ओबीसी समाज पुन्हा मागे पडणार आहे. मात्र सदरील प्रश्नी भाजपच्या वतीने आघाडी उघडली असून आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे. आणि त्याच अनुषंगाने उद्या संपूर्ण राज्यात चक्काजाम आंदोलनाने होणार आहे. त्यानुसार केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.२६ जून रोजी सकाळी ११ वाजता चक्काजाम आंदोलन होणार असून सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात येणार आहे.
तरी तालुक्यातील संपूर्ण ओबीसी समाज बांधवांनी चक्काजाम आंदोलनाला उपस्थिती लावून ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन भाजपचे युवानेते विष्णू घुले यांनी केले आहे.