जाणून घ्या……कांही ठराविक जिल्ह्यातच डेल्टा प्लस चे रुग्ण असताना संपूर्ण महाराष्ट्रात निर्बंध का……?
मुंबई दि.२८ – जेव्हा महाराष्ट्रात दिवसाला सरासरी 25 हजार रुग्ण निघत होते, तेव्हा महाराष्ट्रात अनलॉक मोहिम राबवली गेली, मात्र आता रुग्णसंख्या 10 हजारांच्या आत येऊनही, संपूर्ण राज्य पुन्हा निर्बंधांच्या फेऱ्यात अडकलंय.रुग्ण घटल्यानंतरही निर्बंध लादल्यामागचं पहिलं कारणं म्हणजे कोरोनााच डेल्टा प्लस व्हेरियंट. आणि दुसरं सर्वात प्रमुख कारण म्हणजे दुसऱ्या लाटेवेळी अमरावती जिल्ह्यानं शिकवलेला धडा.
जानेवारी महिन्यात पूर्ण महाराष्ट्र कोरोना संपल्याचा भ्रमात होता. मात्र फेब्रुवारीत अमरावती आणि अचलपूरमध्ये रुग्णवाढ झाली, तेव्हा सरकारनं फक्त अमरावतीला लॉकडाऊन करुन इतर सर्व जिल्हे सुरु ठेवले. ज्याचा परिणाम मार्चमध्ये भारतात कोरोनाची दुसरी लाट पहिल्यांदा महाराष्ट्रातूनच सुरु झाली. महाराष्ट्रात आता तिसऱ्या लाटेचा धोका घोंगावतोय आणि बऱ्यापैकी अमरावतीसारखीच स्थिती कोणकोणत्या जिल्यांमध्ये आहे, ते बघू या……!
फेब्रुवारीच्या सुरुवातीला म्हणजे दुसऱ्या लाटेआधी अमरावतीचा पॉझिटिव्ह रेट 10 टक्क्यांचा आसपास होता. सध्या रत्नागिरीचा पॉझिटिव्ही रेट 10 टक्के आहे. सांगली जिल्ह्यांचा पॉझिटिव्ही रेट सुद्धा 10 टक्क्यांचा वर आहे, साताऱ्यातला पॉझिटिव्ही रेट 9.50 टक्क्यांवर गेलाय, आणि कोल्हापुरातही 8 टक्के रुग्ण बाधित निघतायत. चारही जिल्ह्यांतले हे आकडे पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात निर्बंधांचं प्रमुख कारण आहेत.
दरम्यान अमरावती ते मुंबई फेब्रुवारी महिन्यात एकट्या अमरावती जिल्ह्यात मुंबईपेक्षा जास्त रुग्ण निघत होते. त्याचप्रमाणे सध्या कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यात रोज मुंबईपेक्षाही जास्त रुग्ण सापडतायत. यातलं दुसरं साम्य म्हणजे जेव्हा अमरावतीतून दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली, तेव्हा अमरावतीत कोरोनाचं म्युटेशन झालं होतं. फेब्रवारीत अमरावती जिल्ह्यात E484Q हे म्युटेशन म्हणजे रुप बदललेला कोरोना विषाणू रुग्णांमध्ये सापडला होता. आणि आत्ता सुद्दा देशातले सर्वाधिक डेल्टा प्लस या नव्या व्हेरियंटचे जवळपास निम्मे रुग्ण एकट्या महाराष्ट्रातच आहेत.