#Accident

शेततळ्यात पडून तरूणाचा मृत्यू; केज तालुक्यातील घटना……!

केज दि.३० – शेतातील शेततळ्यातील पाईपलाईनचे झाकण बसविण्यास गेलेल्या तरूणाचा तोल जाऊन शेततळ्यातील पाण्यात बुडवून मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि.३०) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आडस येथे घडली. मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव मोरेश्वर रामचंद्र जोशी (वय-२१) असे आहे.
       तालुक्यातील आडस शिवारात असणाऱ्या कळमआंबा रस्त्यावरील सर्वे नंबर २२२/४ मधील आपल्या शेतात शेततळ्यातील पाइपलाइनचे झाकण लावण्यासाठी मोरेश्वर हा गेला होता. झाकण लावताना त्याच्या शरीराचा तोल गेल्याने तो शेत तळ्यातील पाण्यात पडला. त्यास पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. ही घटना जवळच शेतात काम करणाऱ्या शेतगड्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला असता तो लवकर मिळून आला नाही. तोपर्यंत घटनेची माहिती समजताच शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस शिपाई तेजस वाव्हळ यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.
                मयत तरूण हा पुण्यातील महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. कोरोनाच्या काळात महाविद्यालय बंद असल्याने तो मागील दीड वर्षांपासून गावी शेतावर आई-वडीलांसोबत राहत होता. एकुलता एक असणाऱ्या मुलाच्या अपघाती मृत्यूने आईने फोडलेला हंबरडा हा उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close