केज दि.3 – 1 जुलै डॉक्टर्स डे निमित्त आयोजित केलेल्या ‘अखंड डॉक्टर्स सप्ताह’ या व्याख्यान मालेला असंख्य विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद मिळाला आहे. सदरील व्याख्यानमाला बहुतेक पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यात होत असल्याचे दिसून आले.
व्याख्यान मालेचे आयोजन ज्ञानज्योती कोचिंग क्लासेस केज चे संचालक व श्री वात्सल्य प्रतिष्ठान केज चे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश कलढोणे यांनी केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या मध्येही भविष्यातील डॉक्टर लपलेले असतात असे प्रा. ज्ञानेश कलढोणे यांनी सांगीतले. सामान्य परिस्थिती देखील माणसाला आयुष्यात यशस्वी बनवू शकते, त्या करिता जिद्द, चिकाटी व कठोर मेहनत करण्याची तयारी असायला हवी. अश्याच अति सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचा संघर्षमय प्रवासाचा आढावा या व्याख्यान मालेत घेतला जात आहे.
दरम्यान अखंड डॉक्टर्स सप्ताहाला संपुर्ण महाराष्ट्रातुन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. ही व्याख्यानमाला 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान संध्याकाळी 6 वाजता Prof. DK Sir’s RASAYAN Chemistry या Youtube चॅनेल वर आपल्याला पाहायला मिळेल.