केज दि.१० – एका ३५ वर्षीय महिलेचा सतत पाठलाग करून घरी गेल्यावर लज्जास्पद बोलून हाताला धरत विनयभंग केल्याची घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय महिला ही शेतात मजुरीसाठी एकटी जात असताना दशरथ बोधल जाधव ( रा. नांदूरघाट ता. केज ) हा सतत पाठलाग करून त्रास देत होता. ७ जुलै रोजी रात्री आठ वाजता ही महिला घरी असताना दशरथ याने महिलेस घराबाहेर बोलावून घेतले. घरातून बाहेर येताच लज्जास्पद बोलून, तू माझ्यासोबत चल असे म्हणत हाताला धरून विनयभंग केला. महिलेने नकार देताच शिवीगाळ करीत चापटाबुक्याने मारहाण केली. तू माझ्यासोबत आली नाहीस तर तुला व तुझ्या नातेवाईकांना जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. महिलेने पतीला आवाज देऊन बोलावताच आरोपी तेथून पळून गेला. अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून दशरथ बोधल जाधव याच्याविरुध्द केज पोलिसात ८ जुलै रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे ह्या पुढील तपास करत आहेत.