गोटेगाव येथील कृष्णा गणपत वायकर ( वय ४० ) यांनी गावापासून जवळच असलेल्या सुकळी शिवारात जाऊन एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी सकाळी नऊ वाजता उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, पोलीस नाईक अंगद पिंपळे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसून मयताचा भाऊ महादेव गणपत वायकर यांच्या खबरेवरून युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक अंगद पिंपळे हे पुढील तपास करत आहेत.