#Education
अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षा होणार……!
बीड दि.१७ – महाराष्ट्र राज्य बोर्डाचा निकाल कालच जाहीर झाला. त्यानंतर आता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची एकच धांदल उडणार आहे. यावर्षी परीक्षा न होता अंतर्गत मुल्यमापन पद्धतीने गुण देण्यात आल्याने अकरावी प्रवेशासाठी सीईटी (CET) घेतली जाणार आहे. त्यासाठी 19 जुलैपासून नोंदणीला सुरुवात होणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाहीत.
अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार असून त्यात दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारण्यात येतील. ही परीक्षा एकूण 100 गुणांची असून त्यासाठी 2 तासांचा अवधी देण्यात येईल. परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न असतील आणि ही परीक्षा ओएमआर पद्धतीने होईल. सीईटी परीक्षेच्या गुणांच्या आधारे महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येईल. विशेष म्हणजे ही परीक्षा ऑप्शनल असल्याने सीईटी दिलेल्यांना प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर रिक्त जागांवर प्रवेश दिला जाईल. परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन दहावीच्या गुणांच्या आधारे होईल.
H