ब्रेकिंग
केजचे तहसीलदार यांनी ठोठावला पावणे तीन लाखाचा दंड…….!
केज दि.१९ – तालुक्यात चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याने पकडलेल्या दोन ट्रॅक्टरला तहसीलदारांनी पावणे तीन लाखाचा दंड ठोठावला आहे.
केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य वाळू उपसा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळताच जिल्हा खनिकर्म अधिकारी आरसुळ यांनी दि. १७ जुलै रोजी बेलगाव ता. केज कार्यवाही केली.
यावेळी बेलगाव नदीपात्रात वाळू भरीत असलेले बालासाहेब ज्ञानोबा नाईकवाडे आणि प्रवीण बालासाहेब गायकवाड यांच्या ताब्यातील दोन ट्रॅक्टर पथकाला आढळून आले. त्यावर पथाने कार्यवाही करून मुद्देमालासह ते दोन ट्रॅक्टर केज तहसील कार्यालयात आणले. त्यावर केज तहासिलच्या गौण खनिज विभागाने तहसीलदार दुलाजी मेंडके यांच्या आदेशाने बालासाहेब ज्ञानोबा नाईकवाडे आणि प्रवीण बालासाहेब गायकवाड प्रत्येकी १ लाख ३८ हजार ४०८ रु. असा एकूण २ लाख ७६ हजार ८१६ रु. दंड ठोठावला आहे.