#Education
सीईटी परीक्षेची तारीख ठरली……!
बीड दि.१९ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल दि. २८ मे, २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार दि. १६/०७/२०२१ रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. शासन निर्णय दि. २८ मे, २०२१ व दि. २४ जून, २०२१ नुसार इ. ११ वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आयोजित करण्याचा निर्णय होऊन त्याचा तपशील निश्चित केलेला असून सदर परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत.
त्याअनुषंगाने सन २०२१-२२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत शनिवार दि. २१ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या कालावधीत करण्यात येणार आहे. सदर परीक्षा ही राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील सन २०२१-२२ मधील इ. ११ वी प्रवेशासाठी असून ती विद्यार्थ्यासाठी पूर्णतः ऐच्छिक स्वरुपाची आहे. सदर परीक्षा ही ऑफलाईन स्वरुपाची असून ती राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची (Multiple Choice Objective type Questions) व O.M.R. आधारीत असेल. या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण / प्रविष्ट झालेल्या इच्छुक विद्याथ्र्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या http://cet.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरून आवेदनपत्र सादर करणे आवश्यक आहे. आवेदनपत्र भरण्याची सुविधा मंडळामार्फत दि.२०/०७/२०२१ रोजी सकाळी ११.३० पासून दि. २६/०७/२०२१ अखेर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर आवेदनपत्र भरण्यासंदर्भात तसेच सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी तपशीलवार सूचना सदर प्रकटनासोबत तसेच मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तरी, याची विद्यार्थी, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी असे आवाहन डॉ. अशोक भोसले
सचिव, राज्य मंडळ, पुणे यांनी केले आहे.