माजलगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद आता उमटू लागले असून काँग्रेसच्या नेत्या व जम्मू काश्मीर च्या प्रभारी रजनीताई पाटील यांनी देखील हा प्रकार अतिशय किळसवाणा असून अशा आरोपींना कठोरपणे शिक्षा व्हायला हवी जेणे करून पुन्हा असे प्रकार करण्याचे धाडस कोणीही करणार नाही. अतिशय वेदना देणारी ही घटना असून आपण याबाबत राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांना तात्काळ बोलून हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करणार आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.