#Unlock
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा…..!
मुंबई दि. 8 – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. राज्यात 600 लॅब असल्याचे यावेळी ठाकरे यांनी सांगितले. मुंबईत सामान्यांसाठी लोकल 15 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोविड टास्क फोर्सची उद्या बैठक असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोना गेलेला नसून तो आपल्या आजूबाजूला आहे ,नियमांचे पालन करा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
राज्याचं आर्थिक चक्रही चालणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यात, शहरात कोरोना कमी झाला आहे, अशा ठिकाणी निर्बंध शिथिल करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सोबतच 15 ऑगस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
राज्यातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात आणखी आठ ते दहा दिवस लागतील असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातील आरोग्य सुविधा सुधारली असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही. कोरोनाची दहशत उलथून टाकावी लागणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तर हॉटेल आणि रेस्टॉरंट बाबत उद्या निर्णय जाहीर होणार आहे.
दरम्यान, आम्ही मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. यावेळी राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार देण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे त्यांनी हा अट काढली आहे. मात्र, आरक्षणाला 50 टक्क्यांची मर्यादा आहे. ही अट काढली नाही तर राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार देऊन काहीही उपयोग नाही. त्यामुळे ही अटही केंद्र सरकार काढतील अशी आमची अपेक्षा आहे.