केज दि.१७ – तालुक्यातील शेतक-यांचे पाऊस न झाल्यामुळे झालेल्या पिकांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केज तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे केज तालुक्यातील शेतक-यांनी सोयाबीन, मुग, उडीद, मका हयांचे पेरे केले मध्यंतरी पाऊसाने उघडीप दिल्यामुळे ब-याच शेतक-यांची पिके ही सद्यस्थितीमध्ये करपलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे शेतक-यांचे अतोनात नुसान झालेले आहे. आता पाऊस पडलातरी सदरील पिके ही येणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास गेलेला आहे. याचा सारासारा विचार करुन संबंधित यंत्रणेला पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी जेणे करून शेतकरी जगेल. शेतकरी जगला तरच देशाचा विकास होईल. शेतकरी जर मेटाकुटीला आला तर देश विकासापासून वंचित राहिल. ससदरील बाबीचा विचार करून तातडीने पंचनामे करुन शेतक-यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. सदरील निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.