क्राइम
बीड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील 22 गुंड हद्दपार…….!
बीड दि.25 – सततच्या गुन्हेगारी कारवायांनी पोलिसांचा ताप वाढविणाऱ्या २२ गुंडांना बीडच्या पोलीस अधीक्षकांनी वेगवेगळ्या तालुक्यांमधून हद्दपार केले आहे. हद्द्पारीतील या सर्व २२ जणांनी जिल्ह्यातील वेगवेगळया पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे केल्याचे आरोप आहेत.
पोलीस अधीक्षकांना असलेल्या अधिकारात त्यांनी सुनावणी घेऊन हद्दपारीचे आदेश बजावले. धारूर पोलीस ठाणे हद्दीतील भास्कर ज्ञानोबा फुंदे, विलास ज्ञानोबा फुंदे, श्रीकांत प्रभाकर फुंदे (सर्व रा. उमराई, ता. अंबाजोगाई) यांना धारुर, केज, वडवणी, अंबाजोगाई या तालुक्यातून हद्दपार केले आहे. अंमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आबा मल्हारी सुळ, दादासाहेब आबा सुळ, बालासाहेब बबन सुळ (सर्व रा. खोपटी, ता. शिरुर) यांना शिरुर, आष्टी, पाटोदा या तालुक्यातुन हद्दपार केले आहे. तर संतोष गोरख खोटे, संजय गोरख खोटे, गोरख त्रिंबक खोटे (सर्व रा. मुगगाव, ता. पाटोदा), ज्ञानदेव साहेबराव खोटे, बापुराव साहेबराव खोटे, सुधाकर साहेबराव खोटे, युवराज ज्ञानदेव खोटे (सर्व रा. मुगगाव, ता. पाटोदा) यांना पाटोदा, आष्टी, शिरुर तालुक्यातुन हद्दपार केले आहे. चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जालींदर सर्जेराव येवले आणि विशाल जालींदर येवले (दोन्ही रा. पाथरवाला खु., ता. गेवराई) यांना गेवराई तालुक्यातुन हद्दपार केले आहे. तर बर्दापुर ठाणे हद्दीतील सिध्देश्वर बालाजी दराडे, महादेव बालाजी दराडे (रा. दरडवाडी, ता. अंबाजोगाई) या दोघांना अंबाजोगाई तालुक्यातून हद्दपार केले आहे. पिंपळनेर ठाणे हद्दीतील इसम नामे हरिदास मनोहर जगताप, प्रताप हरिदास जगताप, अमोल हरिदास जगताप (सर्व रा. भवानवाडी, ता. बीड) यांना बीड व वडवणी तालुक्यातुन हद्दपार केले आहे. गेवराई हद्दीतील संतोष हनुमान धनगर (रा. गोपाळवस्ती, बेलगाव, ता. गेवराई), भागवत सखाराम पवार (रा. नागझरी, ता. गेवराई) यांना हद्दपार केले आहे.