राजकीय
बीड जिल्ह्यात काँग्रेस गावागावात पोहचवा; आम्ही पूर्ण ताकतीने आपल्या पाठीशी – रजनीताई पाटील……!
केज दि.२७ – बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा चांगल्या जोमाने भरारी घेईल आता जिल्ह्याला आवश्यक असलेला क्रियाशील अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. कॉंग्रेस पक्ष गावा गावात पोहचेल यासाठी राजेसाहेब देशमुख यांनी काम करावे. आगामी सर्व निवडणुकीत तरुणांना व काम करणाऱ्या कार्यकर्त्याना संधी मिळणार आहे आणि आम्ही यासाठी सर्व ताकतीने आपल्या पाठीशी आहोत. जोमाने कामाला लागा अशा सूचना काँग्रेसच्या नेत्या व जम्मू काश्मीरच्या प्रभारी रजनीताई पाटील यांनी केज येथे छोटे खानी आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलताना केल्या.
बीड जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी राजेसाहेब देशमुख यांची निवड झाल्याबद्दल राजेसाहेब देशमुख केज येथे शिवनेरी बंगल्यावर रजनीताई पाटील व अशोक पाटील यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आले असता आयोजित करण्यात आलेल्या घरगुती सत्कार कार्यक्रमात प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थित होती. पाटलांनी जिल्ह्यातील विरोधकांना पुन्हा आपला “हात” दाखवत जिल्हा काँग्रेस कमिटी आपल्या ताब्यात ठेवली आहे. यावेळी उपस्थित कार्यकर्त्याना बोलताना रजनीताई पाटील व अशोक पाटील यांनी आता जिल्ह्यातील काँग्रेस पुन्हा जोमाने व ताकतीने कामाला लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी जिल्हयातील कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य येणार असा विश्वास उपस्थितांनी बोलून दाखवला.
जिल्ह्यात काँग्रेस वाढवू तसेच टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार – राजेसाहेब देशमुख
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षस्थानी ताईंनी व दादांनी माझी निवड केली व हा विश्वास मी सार्थ ठरवून पक्ष वाढवण्यासाठी व जिल्ह्यातील तरुणांना, काम करणाऱ्या कार्यकर्त्याना सोबत घेऊन कॉंग्रेस गावागावात पोहचवणार असा विश्वास राजेसाहेब देशमुख यांनी बोलताना व्यक्त केला. तर राहुल सोनवणे यांची या पदासाठी वर्णी लागत असताना त्यांनी माझ्यासाठी पद सोडून मला पद देण्यासाठी मनाचा मोठेपणा दाखवला याबद्दल त्यांनी राहुल सोनवणे यांचेही आभार मानले.
————————————————
बीडचे नाना पटोले राजेसाहेब देशमुख !
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी राजेसाहेब देशमुख यांना शुभेच्छा देऊन आता काँग्रेसला अच्छे दिन येतील अशा भावना व्यक्त करत पाटोदा येथील जुबेर चाऊस यांनी राजेसाहेब देशमुख हे बीड जिल्ह्याचे नाना पटोले आहेत अशा शब्दांत त्यांचे अभिनंदन करून ताईंनी व दादांनी योग्य माणसाची निवड केल्याच्या भावना बोलून दाखवल्या.
———————————————–
यावेळी राजेसाहेब देशमुख यांच्या सत्कार प्रसंगी रजनीताई पाटील व अशोक पाटील यांच्यासह आदित्य पाटील, हनुमंत मोरे, राहुल सोनवणे, ऍड. माधव जाधव, नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष देविदास भन्साळी, प्रदेश सरचिटणीस ऍड.अनिल मुंडे, मिनाक्षी पांडुळे, जुबेर चाऊस, प्रा. योगिराज मेटे, श्रीमंत लोंढे, विनोद निबाळकर, गणेश एडके, नारायण होके, प्रा.शिवाजी लाटे, प्रा. मगर, प्रा.मस्के, गणपत कोरे, प्रकाश देशमुख, बाहदूर भाई, ईश्वर शिंदे, गणेश गँगणे, बाळासाहेब ठोंबरे, पशुपतीनाथ दांगट, दलिल इनामदार, अमर पाटील, कबिरोद्दीन इनामदार, कपिल मस्के, लक्ष्मण जाधव, समीर देशपांडे, सचिन रोडे, दत्ता चाळक, संतोष सोनवणे, सुरेश यादव, सिद्धेश्वर रणदिवे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रविणकुमार शेप यांनी तर आभार माऊली विद्यापीठाचे प्रशासक प्रताप मोरे यांनी व्यक्त केले.