#Job

25 हजार पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 31 ऑगस्ट…….!

नवी दिल्ली दि.२९ –  स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने CAPF मधील कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी किंवा जीडी), SSF आणि आसाम रायफल्स मध्ये रायफलमन या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक आहेत. एसएससीनं जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी नोटिफिकेशन 17 जुलै रोजी जारी केलं होतं. एकूण 25 हजार पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशननं यावेळी 25271 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. भरती प्रक्रियेत पुरुष उमेदवारांसाठी 22424 जागा आहेत तर, महिला सांठी 2847 पद आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 31 ऑगस्ट 2021 ही आहे. तर, अर्जाचं शुल्क ऑनलाईन जमा करण्याची अखेरची मुदत 2 सप्टेंबर तर चलनाद्वारे सादर करण्याची अखेरची मुदत 7 सप्टेंबरपर्यंत आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 17 जुलै, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख- 31 ऑगस्ट (रात्री 11.30 वाजेपर्यंत), ऑनलाईन फी जमा करण्याची अखेरची तारीख – 2 सप्टेंबर (रात्री 11.30 वाजता),ऑफलाईन चलन जनरेट करण्याची अखेरची तारीख- 4 सप्टेंबर (रात्री 11.30 वाजता), चलनाद्वारे फी जमा करण्याची अखेरची तारीख – 7 सप्टेंबर, टियर – 1 परीक्षा (सीबीटी) चे तारीख- नंतर कळवली जाणार आहे.

यामध्ये बीएसएफ: 7545, सीआयएसएफ : 8464, एसएसबी : 3806
आयटीबीपी :1431,आसाम रायफल्स: 3785, एसएसएफ: 240, यावेळी सीआरपीएफ आणि एनआयएमध्ये कोणत्याही जागा निघालेल्या नाहीत. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सीएपीएफ जीडी कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.ज्या उमेदवारांचं वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असेल ते अर्ज दाखल करु शकतात.

दरम्यान, उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना पे लेवल -3 च्या प्रमाणे 21700-69100 रुपये पगार मिळणार आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनची ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close