आपला जिल्हा
खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी…..!
केज दि.9 – एका सामाजिक संस्थेच्या आर्थीक गैरव्यवहाराच्या बाबतीत झालेला कथीत अपहार याची माहिती ही दैनिक व नियतकालीकात आणि समाज माध्यमातून प्रसिद्ध केले. याचा राग मनात धरुन नवचेतना सर्वांगीन विकास केंद्राच्या संचालीका श्रीमती मनिषा सिताराम घुले यांनी श्रीराम तांदळे यांनी त्यांची गाडी अडवुन त्यांना दोन लक्ष रु.ची खंडणी मागितली व जिवे मारण्याची धमकी दिली अशा प्रकारची खोटी तक्रार पो.स्टे.ला दिली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, सदर घटना ही कपोलकल्पीत असुन फिर्यादी व कथीत आरोपी यांचे मोबाईल टॉवर कनेक्शन पहिले तर ते एकमेका समोर आलेले नाहीत. म्हणजेच सदर गुन्हा हा सरळ सरळ खोटा आहे. तरी सदर प्रकरणी चौकशी करून सदर गुन्हा रद्य करावा अशी मागणी नायब तहसीलदार सचिन देशपांडे तसेच प्रभारी एपीआय शंकर वाघमोडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष, दशरथ चवरे, पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष, दत्ता मुजमुले, जेष्ठ पत्रकार, प्रा. हनुमंत भोसले, पत्रकार, व संपादक धनंजय कुलकर्णी, संपादक, सतीश केजकर, पत्रकार दत्तात्रय हंडीबाग, मराठी पत्रकार परिषदेचे, पत्रकार, विजय आरकडे, गौतम बचुटे, अनिल गलांडे नंदकुमार मोरे, पत्रकार मुंडे, रमेश इतापे, चंद्रकांत पाटील, गोविंद शिनगारे, पत्रकार लोंढे, पत्रकार ढाकणे, मनोराम पवार, अनिल ठोंबरे, वाजेद शेख,महादेव दळवी, दत्ता मुजमुले, अनिल वैरागे, तसेच सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.