‘हे’ तीन चार दिवस पावसाचे, हवामान खात्याचा अंदाज……!
मुंबई दि.19 – 20 सप्टेंबरपासून पुढचे तीन ते चार दिवस विविध भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील दोन दिवसात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 20 आणि 21 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.