#Social
केज रोटरीचे कार्य कौतुकास्पद – रो अक्षय शेटे…..!
केज रोटरीचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.....!
केज दि.20 – रोटरी ही मैत्री आणि समाजसेवा यांचा संदेश देणारी जगातील सर्वोत्तम सामाजिक संस्था आहे. आजपर्यंत केज रोटरीने विविध माध्यमातून केलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद व समाजोपयोगी आहे असे प्रशंसनीय उदगार डिस्ट्रिक्ट 3132 चे उपप्रांतपाल अक्षय शेटे यांनी काढले. ते रोटरी क्लब ऑफ केज द्वारा आयोजित ‘नेशन बिल्डर’ आदर्श राष्ट्रनिर्माता शिक्षक-शिक्षिका पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.यावेळी गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे, रोटरीचे विद्यमान अध्यक्ष बापूराव सिंगण व सचिव अरुण अंजान यांची उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीमती नयना शिंदे, श्रीमती सावित्रा श्रीमंगले, श्रीमती सुरेखा चौधरी, श्रीमती महादेवी फुलसुरे, श्रीमती दीपाली केजकर, प्रमोद शिंदे, विक्रम डोईफोडे, बालासाहेब चाटे, शंकर तारळकर, शिवशंकर जाधव व वसंत तरकसबंद इत्यादी शिक्षक-शिक्षिकांना ”नेशन बिल्डर आदर्श राष्ट्र निर्माता शिक्षक-शिक्षिका” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अक्षय शेटे यांनी केज रोटरीच्या कार्याचा आढावा आपल्या भाषणातून घेतला. संस्थापक अध्यक्ष हनुमंत भोसले यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या केज रोटरीने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. चांगल्या शिक्षकावरच चांगल्या राष्ट्र व समाज निर्मितीची स्वप्ने पाहिली जाऊ शकतात. केज रोटरीचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले. याव केजचे गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांनी ही केज रोटरीच्या कार्याची प्रशंसा केली व यापुढे केज रोटरी आणि तालुका शिक्षण विभाग यांनी आपसांत समन्वय ठेवून अधिक चांगले कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी केज रोटरी व साई केबल टीव्ही नेटवर्क द्वारा आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धा 2021 चे पारितोषिक वितरण ही पार पडले. या स्पर्धेत श्रीमती सावित्रा शिवशंकर तपसे व वर्षा केशव राख यांना दोन हजाराचे रुपये व प्रशस्ती पत्र विभागून प्रथम पारितोषिक, शीतल उपेंद्र शिंदे व ज्योती विजय अंधारे यांना द्वितीय दीड हजार रुपये व प्रशस्ती पत्रासह विभागून द्वितीय पारितोषिक, स्वाती सुरेश कांबळे यांना पाचशे रुपये व प्रशस्ती पत्र तृतीय पारितोषिक तर दोनशे एकावन्न रुपये व प्रशस्ती पत्राची विशेष पारितोषिके श्रीमती आरती विनायक लोखंडे, श्रीमती सुनीता अनिल सत्वधर व श्रीमती ज्योती अमरसिंह वरपे यांना देण्यात आले.
प्रास्ताविक हनुमंत भोसले यांनी केले.सूत्रसंचालन सूर्यकांत चवरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिव अरुण अंजान यांनी मानले. कार्यक्रमासाठी रोटरी अध्यक्ष बापूराव सिंगण प्रवीण देशपांडे, विकास मिरगणे, महेश जाजू, डी एस साखरे, दादा जमाले पाटील, हारून भाई इनामदार, सीता बनसोड, दत्तात्रय हंडीबाग, धनराज पुरी, अरुण नगरे व श्रीराम शेटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.