संपादकीय
तलावाच्या भरावातून पाणी गळती होत असल्याने धोक्याची घंटा……!
केज दि.२४ – केज पासून 10 किमी अंतरावर असलेल्या तरनळी गावठाण मधील तलावाला मोठमोठे छिद्र पडून त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले आहे. तलाव तुडुंब भरल्याने तलावासह तलावाच्या खाली असलेल्या वस्तीला तसेच शेतीला मोठे नुकसान होऊ शकते.
केज पासून जवळच असलेल्या तरनळी गावठाणात एक तलाव आहे. यावर्षी सदरील भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तलाव तुडुंब भरल्याने परिसरातील शेतकरी सुखावले आहेत. परंतु रात्री झालेल्या मोठ्या पावसाने पाण्याची आवक जास्तच वाढली.
दरम्यान तलावाच्या भरावाला मोठमोठे छिद्र पडून त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर छिद्र मोठे होऊन तलावाला धोका होण्याची शक्यता आहे. तसेच तलावाच्या खालच्या बाजूस वस्ती व मोठ्या प्रमाणावर शेती असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करू लागले आहेत. आणि त्याच अनुषंगाने तरनळी चे सरपंच दादासाहेब बिक्कड यांनी लपा चे उपअभियंता यांना निवेदन दिले आहे.