#Accident

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक…..!

12 / 100

केज दि.१९ – बोरी सावरगाव ते आंबेजोगाई दरम्यान अज्ञात वाहनाने मोटार सायकल ला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना युसूफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.

            केज तालुक्यातील दिपेवडगाव येथील रामप्रसाद भाऊसाहेब गुळभिले वय 37 वर्षे आणि वासुदेव अनंत देशपांडे वय 43 वर्षे हे दोघे बुधवारी (दि.१८) रात्री 11:30 च्या दरम्यान बोरी सावरगावहून आंबेजोगाईला निघालेले असताना त्यांची दुचाकी खटकळी पुला जवळ आली असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.यामध्ये  दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
                सदरील घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्याचे बिट अंमलदार श्री. बडे यांनी पुढील कार्यवाही करत त्यांना आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. आणि त्या ठिकाणी दोघांच्याही मृतदेहाचे शिवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. सदरील अपघात नेमका कसा घडला याची चौकशी एपीआय योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली युसुफ वडगाव पोलीस करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close