आरोग्य व शिक्षण

मराठवाड्यातील दुसरे बालहृदय रोगतज्ञ डॉ.येळीकर केज शहरात…….!

8 / 100

केज दि.25 –  कांही बालकांमध्ये जन्मत: काही आजार असतात. आणि त्या आजारावर उपचार करण्यासाठी ग्रामीण भागातील सर्वसामान्य पालकांना दूरवर शहरात जाऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक झळ सोसावी लागते. मात्र लहान बालकांच्या हृदयाच्या आजारावर तज्ञ असलेले आणि मराठवाड्यातील दुसरे बाल हृदयरोग तज्ञ डॉक्टर नितीन येळीकर हे केज शहरातील योगिता बाल रुग्णालय येथे भेट देणार असून ज्या बालकांना हृदय विकार आहेत अशा बालकांची तपासणी करणार आहेत.

        डॉक्टर नितीन  येळीकर हे केज शहरातील योगिता बाल रुग्णालय या ठिकाणी उद्या दिनांक 26 रोजी दुपारी एक वाजता भेट देणार असून ज्या बालकांना हृदय विकार आहे, हृदयामध्ये छिद्र आहे किंवा काही झडपांची समस्या आहे अशा बालकांची तपासणी करून पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करणार आहेत.तसेच डॉक्टर नितीन येळीकर हे दर महिन्याच्या चौथ्या रविवारी योगिता बाल रुग्णालयात भेट देणार असल्याने परिसरातील बाल रुग्णांची मोठी सोय झालेली आहे तरी ज्या बालकांना हृदयासंबंधी विकार आहे त्या पालकांनी आपल्या पाल्यांची तपासणी करून घेण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञ डॉ.दिनकर राऊत व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.हेमा राऊत यांनी केले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close