#Social

महाराष्ट्र दिनानिमित्त महिलांचा सत्कार संपन्न….!

6 / 100 SEO Score
केज दि.१ – घराची जबाबदारी सांभाळत आपल्या पाल्याना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान साबला ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला.
              कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात ” महाराष्ट्र दिनानिमित्त ” प्रथम राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच कचराबाई राजेंद्र सरवदे तसेच ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ, चेरमन उत्तमराव काकडे, मुख्याध्यापक धनराज धाट – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साबला, अध्यक्ष शंकर नाईकनवरे – शालेय व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद प्राथमिक  शाळा, साबला, सहशिक्षिका श्रीमती वंदना फाटे, अंगणवाडी शिक्षिका सुनंदा काकडे, अंगणवाडी मदतनिस काशिबाई राऊत साबला, आरोग्य सेविका  वर्षा काकडे, नवनिर्वाचित अंगणवाडी मदतनिस शोभा मुळे , ग्रामपंचायात कर्मचारी गुलाब मुळे , विश्वनाथ नाईकनवरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तर ध्वजारोहन उपसरपंच श्रीमती कचराबाई राजेंद्र  सरवदे यांच्या हस्ते करण्यात आले .
           महिलांना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ” पुरस्कार सन – 2024 / 25 हा पुरस्कार  ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सामाजिक, राजकिय, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उत्लेखनिय काम करणाऱ्या  महिलांना ट्रॉफी , प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये आश्रुबाई श्रीमंत काकडे, पारुबाई श्रीमंत नाईकनवरे या महिलांचा यामध्ये  समावेश आहे .
                 आश्रुबाई श्रीमंत काकडे ह्या स्वतः ग्रामपंचायत सदस्य म्हणून राजकारणात सक्रिय आहेत. तसेच त्यांची दोन्हीही मुलं शिक्षण घेऊन वेगवेळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे थोरले चिरंजीव हे पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे स्वतःचा फ्रुटचा व्यवसाय करतात. तर धाकले चिरंजीव हे मुंबई येथे राष्ट्रीय कृत बँकेत नोकरी करतात.तर पारूबाई श्रीमंत नाईकनवरे यांचे पती देखील दोन वेळेस ग्रामपंचायत सदस्य म्हणून तर एक वेळेस सेवा सहकारी सोसायटी संचालक म्हणून त्यांनीही राजकीय क्षेत्रात काम केले आहे. त्यांच्याही मुलांनी शिक्षण घेऊन त्यांचीही दोन्ही मुलं हे वेगवेगळ्या क्षेत्रात  कार्यरत आहेत. त्यामध्ये त्यांचे थोरले चिरंजीव हे शिक्षण क्षेत्रात  माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर  धाकले चिरंजीव हे पुणे येथील कंपनी मध्ये आहेत.
म्हणून या दोन्हीही महिलांची निवड करून त्यांचा सन्मान उपसरपंच कचराबाई राजेंद्र सरवदे , समाजसेवक नरहरी काकडे , ग्रामपंचायत अधिकारी तानाजी शिंपले, पोपट काकडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
                यावेळी राहुल मुळे, श्रीमंत नाईकनवरे, उमाशंकर शिंदे, श्रीमंत काकडे, राजेभाऊ काकडे, जालींदर मुळे, लक्ष्मण काकडे, उद्धव नाईकनवरे, माजी उपसरपंच अभिमान नाईकनवरे, भारत काकडे, माजी व्हाईस चेरमन आत्माराम काकडे,  मेजर अशोक काकडे,  चत्रभुज मुळे, रामचंद्र काकडे, सावताराम नाईकनवरे, अंगद काकडे, रामदास मुळे, पवन सरवदे, अंकुश काकडे, रामभाऊ काकडे, अनंत नाईकनवरे, धनेश्वर पांचाळ इत्यादी नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close