क्राइम
शेतकऱ्यास कुऱ्हाडीने मारहाण, केज तालुक्यातील घटना……!
केज दि.१ – उकांड्यावरील कचरा शेतात येतो असे कारण काढून एका ५३ वर्षीय शेतकऱ्यास शिवीगाळ करीत कुऱ्हाडीने मारहाण केल्याची घटना केज तालुक्यातील बोरगाव ( बु. ) येथे शुक्रवारी ( दि. ३१ डिसेंबर ) रोजी घडली. याप्रकरणी केज पोलिसात दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
बोरगाव ( बु. ) येथील शेतकरी अविनाश परशराम गायकवाड ( वय ५३ ) हे ३१ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास शेतात होते. यावेळी सुरेश भगवान गायकवाड व त्यांची पत्नी अनुसया सुरेश गायकवाड या दाम्पत्याने तुमच्या उकांड्यावरील कचरा आमच्या शेतात येतो असे कारण काढून अविनाश गायकवाड यांना शिवीगाळ करीत कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केले. त्यांना जीवे मारण्याची धमकी ही त्यांनी दिली. अविनाश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सुरेश गायकवाड व अनुसया गायकवाड या पती – पत्नीविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करत आहेत.