देशविदेश

सत्तेच्या पिचवर इम्रान खान आऊट, नवे पंतप्रधान सोमवारी होणार घोषित….!

11 / 100

पाकिस्तानमध्ये मध्यरात्री राजकीय नाट्य पाहायला मिळालं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधात संसदेत आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मतदान झालं. यादरम्यान इम्रान खान यांना पराभवाचा सामना करावा लागला. अविश्वास ठरावाच्या बाजूने 174 मते पडली. इम्रान खान यांचा पक्ष पीटीआय मतदान प्रक्रिशाहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ आहेत आणि ते पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) चे अध्यक्ष आहेत. अविश्वास ठराव जिंकल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी संसदेत सांगितले की, ‘आज पुन्हा पाकिस्तानमध्ये संविधान आणि कायदा आला आहे. आम्ही कोणावरही सूड घेणार नाही, अन्याय करणार नाही. आम्ही निरपराधांना तुरुंगात पाठवणार नाही. कायदा मार्गी लागेल. आम्ही बिलावल भुट्टो आणि मौलाना फजलूर (युती पक्षांचे नेते) यांच्यासोबत सरकार चालवू.’ इम्रानखान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षांना 342 सदस्य असलेल्या सभागृहात 172 सदस्यांच्या पाठिंबा आवश्यक होता. अविश्वास ठरावाच्या बाजूने 174 मते पडली आहेत. मतदानानंतर सभागृहातील विरोधी पक्षांनी गळाभेट घेऊन आनंद व्यक्त केला.

क्रिकेटपटू ते राजकारणी बनलेल्या इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्ष आणि सत्ताधारी आघाडीच्या काही मित्रपक्षांच्या असंतुष्टीमुळे विरोधी पक्षांनी अधिक पाठिंबा मिळवला. विशेष म्हणजे, आतापर्यंत पाकिस्तानमधील एकाही पंतप्रधानाने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही.येत सहभागी झाला नाही. इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी पंतप्रधान निवासस्थान सोडले. पीटीआयचे खासदार फैसल जावेद यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘त्यांनी सभ्यतेने पदभार सोडला आणि नतमस्तक झाले नाही.’

दरम्यान, आता पुढील पंतप्रधानाची निवडणूक सोमवारी होणार आहे. इम्रान खान यांच्या विरोधात एकजूट राहिलेल्या विरोधकांनी शाहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचा आधीच नवा चेहरा बनवलं आहे. अशा स्थितीत शाहबाजच पंतप्रधान होणार हे स्पष्ट झालं आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close