हवामान
पुढील चार दिवस ”या” १३ जिल्ह्यांत हवामान विभागाकडून ”येलो अलर्ट”……!
मुंबई दि.६ – हवामान विभागाकडून मुंबईत १० जूननंतर पाऊस पडणाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. त्यानंतर आता हवामान विभागाकडून (IMD) राज्यातील १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, परभणी, पुणे, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, ६ ते ९ जूनपर्यंत १३ जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा इशारा दिला आहे. सध्या मान्सुन सरींसाठी परिस्थिती अनुकूल नाही. ६ ते ९ जून या कालावधीमध्ये हवेचा दाब काही भागांमध्ये किंचित कमी होत आहे.
दरम्यान, यावर्षी मान्सून १६ मे रोजी दाखल झाला. त्यानंतर केरळमध्येही ४ दिवस अगोदर दाखल झाल्याने आनंदाचे वातावरण होते, पण अरबी समुद्रात आल्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला आहे.