शेती
निमज गावात कृषीकन्यांचे आगमन……!
संगमनेर दि.७ – कृषी उपक्रमाचे औचित्य साधून महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत सुरु असलेल्या ‘ग्रामीण कृषी जागरुकता व औदयोगिक कार्यानुभव 2022-23’ या कार्यक्रमाला श्रमशक्ती कृषी महाविदयालय, मालदाड, येथील कृषीकन्या भुसाळ पुजा, चौधरी पल्लवी, चौधरी रोहीणी, चव्हाणके कल्याणी, डेरे किरण, ढगे श्रुती यांनी सुरुवात केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच- गोरक्ष डोंगरे ग्रामसेवक- मालुंजकर साहेब उपसरपंच- अनिल कासार कृषीमित्र डि. न .मतकर त्यासमवेत गावातील ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी उपस्थित होते.
अभ्यास दौर्याच्या दोन महिन्याच्या कालावधीत माती परिक्षण, पाणी व्यवस्थापन, किड रोग नियंत्रण पिक संरक्षण याबाबत अद्यावत माहितीचा थोडक्यात आढावा दिला .
या उपक्रमासाठी श्रमीक उद्योग समुहाचे व सेवा संस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव नवले तसेच महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद हारदे, प्रा. निलेश तायडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. नेहा काळे आणि सर्व कार्यक्रम अधिकारी व विषय तज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे.