आपला जिल्हा
विड्यात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर…..!

केज दि.१ – तालुक्यातील विडा येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे २१ युवकांनी रक्तदान केले. तसेच केंद्रीय जि.प. शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच सुरज पटाईत उपसरपंच सदाशिव वाघमारे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. शीला कांबळे, मुख्याध्यापक श्री.सुरवसे, नामदेव दुनघव, विकास दूनघव, रामेश्वर दुनघव, परमेश्वर गालफाडे, तानाजी दुनघव, आकाश जाधव, गणेश दुनघव रक्षक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.