शहरातील शिक्षक कॉलनी भागातील अनिता युवराज कांबळे ही महिला तिच्या दिव्या व आशिष या दोन लेकरांसह दि.२५ जुलै पासून बेपत्ता आहे. सदरील महिलेचा कुटुंबीयांनी शोध घेतला परंतु शोध न लागल्याने केज पोलीसांत खबर दिली आहे. ठाणे प्रभारी शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. चौधरी हे तपास करत आहेत.
तर अन्य एका घटनेत शहरातील फुलेनगर भागातील अंकिता दीपक ढाकणे ही ३२ वर्षीय महिला तिच्या दोन वर्षीय मुलीसह दि. १५ ऑगस्ट रोजी स्कुटीवर घराबाहेर पडली होती. परंतु अद्यापपर्यंत सदर महिला घरी न परतल्याने तिच्याही कुटुंबीयांनी पोलीसांत तक्रार दिली असून सदर घटनेचा तपास ठाणे प्रभारी शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे हे करत आहेत.
दरम्यान शहरातून दोन महिला अचानक गायब झाल्याने शहरात खळबळ उडाली असून सदर महिलांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.