ब्रेकिंग
खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी……!

मुंबई दि.१ – खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा व्यक्ती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत आहेत. दिल्ली में मिल तुझे एके 47 से उडा देंगे, अशी धमकी या मेसेजमधून देण्यात आली आहे. दरम्यान, या धमकीनंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.तर अभिनेता सलमान खान यांनाही याच गँगने धमकी दिल्याचा प्रकार घडलेला आहे.