#Job

सरकारी नौकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी…..!

14 / 100

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रिक्त पदे भरली जाणार आहेत. दरम्यान, या भरतीद्वारे पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ छत्रपती संभाजीनगर/ अमरावती विभागातील “रचना सहायक” (गट-ब) (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत.

            यामध्ये रचना सहायक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 177 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या अर्जदाराची शैक्षणिक पात्रता ही स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षांची पदविका असणे आवश्यक आहे.तर पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती या सर्व विभागांमध्ये भरती केली जाणार आहे. तर यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराची वयोमर्यादा ही 18 ते 40 वर्षे इतकी असणे आवश्यक आहे.अर्ज करण्यासाठी अराखीव प्रवर्गसाठी रु. 1000/- इतका अर्ज शुल्क आकारला जाणार असून राखीव प्रवर्ग यांसाठी रु. 900/- इतका अर्ज शुल्क आकारला जाणार आहे.
        दरम्यान, या पदभरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात ही 01 एप्रिल 2023 पासून सुरु होणार आहे. तर शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 ही आहे. भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्यासाठी http://shorturl.at/uxKX6 या आणि http://shorturl.at/qzIP8 लिंक वरून अर्ज करावा.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close