#Election
केज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मुंदडा, आडसकरांचे पारडे जड….!
केज दि.२५ – बाजार समितीचे मतदान (दि.२८) एप्रिल रोजी होत असून या निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. तसेच केज कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप नेते रमेशराव आडसकर यांचे अनेक वर्षांपासून वर्चस्व राहिलेले आहे. मागील केज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ज्या ज्या वेळेस निवडणूका झाल्या त्या त्या वेळेस रमेशराव आडसकर हे किंगमेकर ठरले आहेत.

या वेळेस त्रिशंकू परिस्थिती असली तरी आमदार नमिता मुंदडा, भाजपचे रमेशराव आडसकर, नंदकिशोर मुंदडा हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत किंगमेकर ठरतील असे दिसत आहे.