#निधन वार्ता
उपचारादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचे निधन……!
केज दि.९ – तालुक्यातील कानडी माळी येथील रहिवाशी तथा बीड पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असणारे दिलीप मुकुंद राऊत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 57 वर्षे होते.
तालुक्यातील कानडी माळी येथील रहिवाशी दिलीप मुकुंद राऊत हे मागच्या काही वर्षांपासून बीड पोलीस दलात कर्तव्यावर होते. ते सध्या बीड येथे पोलीस मुख्यालयात सेवा बजावत होते. परंतु मागच्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. आणि त्यातच त्यांचा दिनांक 9 जून 2023 रोजी मृत्यू झाला.
दिलीप राऊत हे अवघ्या दोन वर्षांमध्ये सेवानिवृत्त होणार होते. परंतु अल्पशा आजाराने त्यांचे वयाच्या 57 व्या वर्षी दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर शहरातील अंकुश नगर भागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर रक्षा सावडण्याचा कार्यक्रम दिनांक ११ जून रोजी सकाळी आठ वाजता राक्षशभुवन येथे ठेवण्यात आल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.