केज दि.26 – दुचाकी आणि ट्रॅक्टर च्या अपघातात तालुक्यातील आनंदगाव सारणी येथील एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना कळंब अंबाजोगाई रोडवरील युसूफ वडगाव नजीक गुरुवारी सायंकाळी घडली आहे. 32 years old youth died in road accident on Kalam Ambajogai road
तालुक्यातील आनंदगाव सारणी येथील (हल्ली मुक्काम पाथरा) सुनील नामदेव राऊत (32) हा युवक दुचाकीवर चालला असता युसुफ वडगाव पासून कळंब कडे जाणाऱ्या रोडवर रस्त्यावरील नदीजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकीचा अपघात झाला.यात सुनील राऊत या युवकाचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, सदरील अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पत्रकार मनोरम पवार व अन्य नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त युवकास तातडीने उपचारार्थ हलवण्याचा प्रयत्न केला. परंतु युवकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झालेला होता.अपघाताचे कारण अद्याप समजले नसून अपघातग्रस्त युवकाचा मृतदेह युसुफ वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे.