#Job

डॉ.स्नेहल मोटेगावकर हिची क्लासवन अधिकारी म्हणून निवड….!

6 / 100
केज दि. 26 – आदर्श शिक्षक,कै. रामदासराव मोटेगावकर (गुरुजी) यांची नात व सौ.सुनीता व श्री.शरदराव मोटेगावकर सेवा निवृत्त प्रभारी प्रबंधक व अधीक्षक, अप्पर जिल्हा व सत्र न्यायालय,अंबाजोगाई यांची कन्या, कु.डॉ.स्नेहल शरदराव मोटेगावकर यांची महाराष्ट्र लोकसेवाआयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पशुधन विकास अधिकारी वर्ग -१ या पदासाठी पहिल्याच प्रयत्नात निवड झाली.
                 डॉ. स्नेहल यांनी पदवीचे शिक्षण शासकीय पशुवैद्यकीय व पशुविज्ञान विद्यापीठ, परभणी येथून पूर्ण केले असून पदव्युत्तर शिक्षण शासकीय पशुवैद्यकीय व पशुविद्यान विद्यापीठ, मुंबई  येथे  चालू आहे. त्यांच्या यशाबद्दल डॉ. स्नेहल तसेच त्यांचे पालक सौ.सुनिता व श्री. शरदराव रामदासराव मोटेगांवकर यांचं व मोटेगावकर परिवाराचे सामाजिक व शासकीय सर्वच स्तरातून व नाभिक समाज बीड जिल्हा व सर्व नाभिक बांधव यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन होत आहे.

” माझ्या यशामागे कठीण मेहनत व आई-वडील तसेच आजी – आजोबा कै.सत्यभामा व कै.रामदासराव मोटेगावकर(गुरुजी) यांचा मोलाचा वाटा आहे. मला वेळोवेळी भेटलेले शिक्षक, स्नेही जणांचे व कुटुंबियांचे मार्गदर्शन या प्रवासात खूप मोलाचे होते. अशी भावना डॉ.स्नेहल यांनी व्यक्त केली.”

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close