क्रीडा व मनोरंजन
काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…..!
केज दि. ५ – बीड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा युवा नेते राहुल सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील क्रीडा प्रेमींनी उद्घाटन समारंभासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
बीड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा वीर हनुमान शिक्षण संस्थेचे सचिव राहुल सोनवणे यांचा 6 मार्च रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त गावातील तरुणांनी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदरील स्पर्धेचे उद्घाटन गावातील गायरान येथील क्रीडा मैदानावर होणार असून सदरील उद्घाटनासाठी युसुफ वडगाव ठाण्याचे एपीआय श्री. शेंडगे हे उपस्थित राहणार आहेत. सदरील क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 51 हजार, द्वितीय पारितोषिक 21000 तर तृतीय पारितोषिक 11000 असे ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे 25 क्रिकेट संघांनी नाव नोंदणी केली असून उद्यापासून भव्य असे क्रिकेट सामने क्रीडा प्रेमींना पाहायला मिळणार आहेत.
दरम्यान, क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी परिसरातील क्रीडा प्रेमींनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.