#important

मोफत वीज योजनेची माहिती देण्यासाठी केज पोस्टाचे कर्मचारी घरोघरी…..!

10 / 100
(सर्वांसाठी उपयुक्त योजना)
बीड दि.६ – ‘पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना’ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांवर सोपविण्यात आली आहे.
                     केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला नुकतीच मंजुरी दिली आहे. या योजनेत. १ कोटी घरांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. या योजनेसाठी भारतीय डाक विभागास नोडल एजन्सी म्हणून मान्यता दिली आहे. डाक विभाग पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील. लोकांना लाभाची माहिती देतानाच मोबाइल ऍप्लिकेशनमध्ये नोंदणीही करतील.’
                केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी १३ फेब्रुवारी रोजी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेत ३०० युनिटपर्यंत मोफत वीज तर मिळेलच; पण, १५,००० रुपये वार्षिक उत्पन्नही मिळेल.
               दरम्यान, केज तालुक्यातही शहरी व ग्रामीण भागात सदर योजनेची माहिती देण्यासाठी केज पोस्टाचे कर्मचारी घरोघरी जाऊन सविस्तर माहिती देत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close