आपला जिल्हा
मनोज जरांगे पाटील दि.14 मार्च रोजी केज शहरात….!
केज दि.९ – मराठा आरक्षण लढ्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा महाराष्ट्रात संवाद दौरा सुरू केला आहे. आणि याचाच एक भाग म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ही अनेक ठिकाणी त्यांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. केज शहरातही मनोज जरांगे यांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले असून संवाद दौरा मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यासाठी पूर्वतयारी बैठक संपन्न झाली.
मराठा आरक्षणाचे योद्धा मनोज जरांगे यांनी मागच्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी मोठा लढा उभारला आहे. मराठा समाज बांधवांचा त्या लढ्याला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. मराठा आरक्षण लढ्यामुळेच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत. मात्र आणखीही काही मागण्या प्रलंबित आहेत. मात्र जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा कायम ठेवण्याचे संकेत मनोज जरांगे यांनी दिले आहेत. आणि याचीच जनजागृती करण्यासाठी सध्या महाराष्ट्रभर संवाद दौरे आयोजित करण्यात येत आहेत.
दरम्यान केज मध्येही मनोज जरांगे यांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 14 मार्च रोजी सकाळी 12 वाजता धारूर रोडवरील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात संवाद दौरा आयोजित करण्यात आलेला आहे.
सदरील दौरा मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यासाठी पूर्वतयारी बैठक येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती.तसेच मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधवांनी संवाद बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.