आरोग्य व शिक्षणआपला जिल्हासंपादकीय
डी डी बनसोडे
May 5, 2025
केज तालुक्याचा बारावीचा निकाल ९६.९६ टक्के…..!

केज दि.५ – दरवर्षी पेक्षा यावर्षी तब्बल दहा ते बारा दिवस लवकर पार पडलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यामध्ये राज्याचा निकाल ९१.८८ तर यामध्ये केज तालुक्याचा निकाल ९६.९६ टक्के लागला आहे.
दरवर्षीपेक्षा यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा तब्बल दहा ते बारा दिवस अगोदर घेण्यात आल्या होत्या. यामध्ये कोकण विभागाने सर्वात जास्त टक्केवारी मिळवत राज्यात बाजी मारली तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला. यामध्ये केज तालुक्याच्या निकालाकडे जर पाहिले तर केज तालुक्यात एकूण ३६ महाविद्यालया मधून ५६३२ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. यामध्ये ५५९९ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला प्रविष्ट झाले. यामध्ये २०९४ विद्यार्थी विशेष प्राविण्यात २७४६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ५८९ विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. एकूण ५४२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि तालुक्याचा एकूण निकाल ९६.९६% लागला.
तालुक्यातील पुरुषोत्तम दादा सोनवणे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखेत एकूण २९२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते आणि तेवढेच विद्यार्थी प्रविष्टही झाली होती. त्यापैकी २३९ विद्यार्थी विशेष प्राविण्यात, ५१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर द्वितीय श्रेणीत दोन विद्यार्थी असे एकूण २९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आणि विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. तर कला शाखेमध्ये ७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरले होते. यामध्ये ७६ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आणि यातून िशेष प्राविण्यामध्ये २७ प्रथम श्रेणीत, ४१ तर द्वितीय श्रेणीत चार असे एकूण ७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि कला शाखेचा एकूण निकाल ९४.७३% एवढा लागला. तर महाविद्यालयाचा एकूण निकाल ९८.९१% एवढा लागला.
दरम्यान, पुरुषोत्तम दादा सोनवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम राखल्याने संस्थेचे सचिव राहुल सोनवणे, प्राचार्य पी.एच. लोमटे यांच्यासह शिक्षक कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
पाच महाविद्यलयांचा निकाल १०० टक्के…..!
तालुक्यातील स्व.चांगदेवराव तांबडे महाविद्यालय पिठ्ठी घाट, जीवन विकास क.म. केज, गणेश म.वि. तांबवा, पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव, टेक्नो व्हिजन आयटीआय बोरी सावरगाव या महाविद्यलयांचा निकाल १००% लागला आहे.