आरोग्य व शिक्षणब्रेकिंग
दहावीच्या निकालाची तारीख जाहीर….!

पुणे दि.१२ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 5 मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर दहावीचा (SSC) निकाल कधी लागणार याबाबत सर्वांना विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता होती. आता त्यांची ही उत्सुकता संपली आहे. दहावीच्या परीक्षाचा निकाल (SSC RESULT) 13 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.