#Social

निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी….!

Social responsibility retired police personalities

9 / 100 SEO Score

पुणे दि. १७ – माणसांची पारख ही दुःखातच होते असे म्हणतात एखाद्यावर संकट आले तर त्याच्याकडे कानाडोळा न करता आपल्याकडून जेवढं शक्य आहे तेवढी मदत करणे त्याला धीर देणे याला माणुसकी म्हणतात आणि असाच एक माणुसकीचा उदाहरण सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आणि संकटात सापडलेल्या आपल्या मित्राला शक्य होईल तेवढी मदत केली

            पुणे येथे निवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शाक्य संघ शौर्य विजय स्तंभ नावाची  बहूउद्देशीय सामाजीक संस्था चालवतात. ही संस्था नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असते. आणि याचाच एक भाग म्हणुन एएसआय वसंत कांबळे यांच्या पत्नीच्या आजारपणा च्या औषध उपचारा साठी जहांगीर हॉस्पिटल येथे जाऊन संस्थेच्या उपअध्यक्षा रंजनाताई रणपीसे, सदस्य विजय सरावते, विष्णु गायकवाड, श्री. थोरात तसेच संस्थेचे सल्लागार फुलचंद वाघमारे यांनी १८३०० रुपयांची मदत करून सामाजिक बांधिलकी जपली.
          दरम्यान सदर संस्था नेहमीच  तन मन धनाने बहुजन समाज बांधवांच्या सुख दुःखात मदत करण्यासाठी तत्पर असते. आणि महामावांची विचारधारा ची जोपासते अशी भावना फुलचंद वाघमारे यांनी व्यक्त केली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close