#Social
सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी….!

पुणे दि. २ – साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त शाक्य संघ शौर्य विजय स्तंभ सेवा निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी बहूउद्देशीय सामाजिक संस्था पुणे यांच्या वतीने बिगुल वाजवुन मानवंदना देण्यात आली.
या वेळी संस्था अध्यक्ष सुभाष सर्वगोड, संस्थेच्या उपाध्यक्षा रंजना रणपीसे, संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब माने, फुलचंद वाघमारे, महादेव आठवले, सोणवने, डी. बी. थोरात, चव्हाण मॅडम, अशोक शेलार आणि अन्य सहकारी उपस्थित होते. शाक्य संघ शौर्य विजय स्तंभ सेवा निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी बहूउद्देशीय सामाजिक संस्थेच्या रजिस्ट्रेशन चे काम प्रगतीपथावर असून लवकरच संस्था रजिस्टर होणार आहे.सदर संस्था महामानवांच्या विचारधारा जोपासणारी आहे.